दृष्टीकोन
सामाजिक आर्थिक परिघावर असलेल्या महिलांमध्ये प्रगतीशील नागरिकत्वाची क्षमता विकसीत करण्यासाठी, त्यांच्यातील आत्मविश्वास जागृत करणे जेणेकरुन त्या मुक्तपणे व्यक्त होतील.
ध्येय
जीवनातील शिक्षणाची संधी चुकलेल्या वंचित महिलांपर्यंत पोहचून, साहित्य आणि कलेच्या माध्यमातून क्रीयाशील जीवन शिक्षण विकसीत केल्याने त्यांच्या मध्ये सामाजिक-आर्थिक कौशल्ये तयार होवून त्या सक्षम होतील. परिणामी त्यांच्या आकांक्षा वृध्दींगत होवून त्यांच्या जीवनात व्यापक परिवर्तन घडेल.