कला आणि साहित्य

ग्यानरुची परिसरातील महिलांसाठी नियमितपणे गीत,नृत्य, नाटक, कथा अशा उपक्रमांचे आयोजन करते. कलावाङमयाचा उपयोग करताना सामाजिक, आर्थिक स्थिती ही त्यांच्या सर्जनशीलतेमध्ये अडथळा होवू नये हा आमचा प्रयत्न असतो. नियमितपणे वाचन, लेखन कार्यशाळा, कथाकथन, गट चर्चा यांचे आयोजन केले जाते.

वाचन हा ग्यानरुचीच्या तत्वज्ञानाचा मूळ गाभा आहे. वृत्तपत्र, पुस्तक वाचनातून त्यांना कार्यक्षम साक्षरता सुलभ करतो. डायरीच्या माध्यमातून त्यांचे विचार आणि आकांक्षा तयार करण्यासाठी प्रोत्साहन देतो.