प्रेरणा

होळी, गोकुळाष्टमी, दसरा, दिवाळी या सारख्या सणांच्या निमित्ताने सांस्कृतिक उपक्रमाचे आयोजन ग्यानरुची करते. त्यानिमित्ताने केंद्रातील महिला मनमोकळेपणाने एकमेकात मिसळतात. यातून त्यांच्यामधील मैत्री, सहकार्याची भावना वाढते. आपली यशोगाथा इतरांना सांगणे, प्रेरणादायी अनुभव कथन, गुणवंतांचा सन्मान यातून आत्मविश्वास व स्वतःबद्दलची जाणीव, ओळख निर्माण होते. ग्यानरुचीच्या वतीने गुणवंत महिलांना पुरस्कार देवून सन्मानित करण्यात येते. हे उपक्रम वस्तीमधील इतर महिलांना सुध्दा प्रेरणा देतात.