सहभागी व्हा
महिलांना शिक्षणाची गोडी वाटावी आणि त्यांना शिक्षणासाठी अधिक चांगल्या सुविधा देता याव्यात या हेतूने ग्यानरुचीच्या महिलांची शैक्षणिक सत्रे घेण्यासाठी आम्ही अध्यापन, कला किंवा सामाजिक कार्याचा अनुभव असलेल्या स्वयंसेवकांच्या शोधात आहोत.
सध्या वस्तीपातळीवर महिलांसाठी इंग्रजी भाषा वर्ग सुरु आहेत. त्यासाठी अध्यापनाचा अनुभव असणा-या (निवृत्त किंवा सुट्टीच्या काळात काम करु इच्छिणा-या) स्वयंसेवकांची आवश्यकता आहे.
समाज माध्यमांचे व्यवस्थापन, उपक्रमांचे संग्रहण, दस्तऐवजी करण, शैक्षणिक सामग्री विकसात मदत करण्यासाठी इंटर्नशीप करु इच्छिणा-या विद्यार्थ्यांच्या आम्ही शोधात आहोत. आम्ही संशोधनात रस असलेल्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देतो. ग्यानरुचीमध्ये 6 ते 12 आठवड्यांसाठी इंटर्नशीप करता येईल. इच्छुकांनी स्वतःची माहिती, आवडीचे क्षेत्र, सीव्ही पाठवावेत.
अल्प उत्पन्न असणार्या वस्तीपातळीवरील स्त्रियांना मदत करण्यासाठी, ठोस कार्यक्रम आणि पाठींबा देण्यासाठी सहयोग देवू इच्छिणा-या स्वयंसेवी संस्था, एनजीओचे स्वागत आहे.