कौशल्य निर्मिती उपक्रम

ग्यानरुचीच्या वतीने महिलांमध्ये व्यावसायिक कौशल्य निर्मिती करण्यासाठी उपक्रम राबवले जातात. पेपर बॅग, आकाश कंदील बनवणे सारखे छोटे आणि स्पोकन इंग्लिश, फॅशन डिझाईन, शिवणकाम, भरतकाम यासारख्या दीर्घकालीन अभ्यासक्रमाचा लाभ महिला घेतात. केंद्रातील महिलांची गरज, आवड, ग्रहण क्षमता लक्षात घेवून उपक्रमांचे आयोजन केले जाते.

ग्यानरुचीच्या वतीने वस्तीमधील महिलांसाठी इंग्रजीचा विशेष अभ्यासक्रम शिक्षक, तज्ञ आणि प्रशिक्षक यांच्या मदतीने विकसीत केला आहे. २४ सत्रांचा हा प्राथमिक अभ्यासक्रम  जानेवारी महिन्यापासून प्रायोगिक तत्वावर वस्तीपातळीवर सुरु आहे. विशेष म्हणजे या प्रयोगाला चांगला प्रतिसाद मिळाला. विश्वात बोलल्या जाणा-या इंग्रजी भाषेचा परिचय होणे, ती अवगत होणे ही वस्तीमधील महिलांसाठी अभिमानाची आणि त्यांचा सामाजिक स्तर उंचावणारी अशी गौरवाची बाब आहे.