आत्म जागरूकता
ग्यानरुची केंद्रातील महिलांशी संवाद सुरु झाल्यावर तो दुहेरी संवाद राहील याची आम्ही काळजी घेतो. परस्पर परिचय वाढल्यानंतर स्वः ओळख निर्माण करुन देणारे सत्र सुरु करतो. शिक्षण तज्ञ मशरत तवावाला यांनी ही शैक्षणिक सत्रे विकसीत केली आहेत.
ही सत्रे महिलांना त्यांच्यातील सर्जनशील प्रवृत्ती ओळखण्यास आणि सुरक्षित वातावरणात त्यांचे प्रदर्शन करण्यात मदत करतात. यातून त्या आपले व्यक्तीमत्व, कुटूंबातील स्थान, याच बरोबर आपले ध्येय, स्वप्ने यांकडे पाहण्याची वेगळी दृष्टी देतात. यातून आत्मविश्वास वाढण्या बरोबरच नव्याने स्वओळख होण्याची अनुभूती मिळते. ज्यातून त्यांचा आत्मसन्मान वाढतो.