नेतृत्व कौशल्य
संशोधनातून असे दिसते की, महिला या उत्तम व्यवस्थापक, एकाच वेळी अनेक विषय हाताळण्याची हातोटी असणा-या आणि अंमलबजावणीत कुशल असतात. महिलांसोबत आजवर करत असलेल्या कार्यातून आम्हाला असे जाणवले की, या महिलांच्या प्रगतीच्या आड येणारा सर्वात मोठा घटक हा आर्थिक साक्षरता नसणे हा आहे.
आम्ही महिलांना मासिक, वार्षिक अर्थसंकल्प तयार करण्यास, शैक्षणिक खर्च, उत्सव, घर दुरुस्ती तसेच वैद्यकीय आपत्कालीन परिस्थिती यासारख्या अनपेक्षित खर्चाचे नियोजन करण्यास मदत करतो. नियोजित सत्रांद्वारे आम्ही महिलांना बँक खाते उघडणे, बँकेतील व्यवहार, बचत, आरोग्य व जीवन वीमा आदींची माहिती देतो.