महिलांच्या दैनंदिन जीवनात शिक्षण, मनोरंजन आणि प्रगतीचे वैचारीक खाद्य पुरवण्याचे काम ग्यानरुची करते.
आमची ऑन ग्राउंड टीम दोन आघाड्यांवर काम करते. प्रथम, ते शहरातील वस्ती आणि मोहल्ल्यांमधील महिलांची भेट घेवून त्यांच्या विशिष्ट गरजा आणि योजना समजून घेतात. या माहितीचा आधार घेवून महिला सक्षमीकरणाचे विस्तृत मॉड्यूल विकसित करतात. त्यामध्ये शिक्षक, आरोग्य व्यावसायिक, कलाकार, लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते यांचे सहकार्य घेतात. महिलांना या उपक्रमामध्ये रस वाटावा असे मॉडुयल तयार झाले की ते सर्व विभागांमध्ये सादर केले जाते.
आरोग्य-शिबिरे, इंग्रजी भाषा वर्ग किंवा अगदी नृत्य-नाट्य कार्यशाळांद्वारे, महिलांमध्ये आत्म सन्मान निर्माण करणे आणि त्यांची आत्मनिर्भरता वाढविणे हा एकच हेतू आहे.
आम्हाला आशा आहे की, ग्यान रुची राबवत असलेल्या शैक्षणिक प्रक्रियेतून मिळालेल्या सक्षमीकरणाच्या संधींमुळे महिलांमध्ये आत्मविश्वास वाढून जागरूक आणि सुधारणा वादी नागरिक वाढण्यास मदत होईल. त्यांना मिळालेले ज्ञान आणि कौशल्य यातून या महिलांचे कुटुंब आणि समाज यामध्ये सकारात्मक परिवर्तन होण्यास मदत होईल.