महिला

सक्षमीकरण कार्यक्रम

एखाद्या व्यक्तीला सामर्थ्यवान बनविण्यासाठी सतत प्रयत्न करावे लागतात. कारण सशक्तीकरण म्हणजे केवळ संधी उपलब्ध करुन देणे नाही, तर हळूहळू आणि स्थिरतेने कौशल्य तयार करणे, त्यांच्यातील आत्मविश्वास वाढविणे आहे. त्याला जोड म्हणून त्यांच्यातील आकांक्षा वाढवणे देखील गरजेचे आहे. अल्प उत्पन्न गटातील महिला आत्मविकासाच्या संधीपासून दूर असल्याचे कटू सत्य आपल्या समाजात दिसते. बरेचदा त्या एकत्र येवून काही प्रयत्न, कृती करत असल्या तरी त्यांची स्वतःची क्षमता, आकांक्षा याबाबत त्या अनभिज्ञ असतात.

महिलांच्या दैनंदिन जीवनात शिक्षण, मनोरंजन आणि प्रगतीचे वैचारीक खाद्य पुरवण्याचे काम ग्यानरुची करते.

आमची ऑन ग्राउंड टीम दोन आघाड्यांवर काम करते. प्रथम, ते शहरातील वस्ती आणि मोहल्ल्यांमधील महिलांची भेट घेवून त्यांच्या विशिष्ट गरजा आणि योजना समजून घेतात. या माहितीचा आधार घेवून महिला सक्षमीकरणाचे विस्तृत मॉड्यूल विकसित करतात. त्यामध्ये शिक्षक, आरोग्य व्यावसायिक, कलाकार, लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते यांचे सहकार्य घेतात. महिलांना या उपक्रमामध्ये रस वाटावा असे मॉडुयल तयार झाले की ते सर्व विभागांमध्ये सादर केले जाते.

आरोग्य-शिबिरे, इंग्रजी भाषा वर्ग किंवा अगदी नृत्य-नाट्य कार्यशाळांद्वारे, महिलांमध्ये आत्म सन्मान निर्माण करणे आणि त्यांची आत्मनिर्भरता वाढविणे हा एकच हेतू आहे.
आम्हाला आशा आहे की, ग्यान रुची राबवत असलेल्या शैक्षणिक प्रक्रियेतून मिळालेल्या सक्षमीकरणाच्या संधींमुळे महिलांमध्ये आत्मविश्वास वाढून जागरूक आणि सुधारणा वादी नागरिक वाढण्यास मदत होईल. त्यांना मिळालेले ज्ञान आणि कौशल्य यातून या महिलांचे कुटुंब आणि समाज यामध्ये सकारात्मक परिवर्तन होण्यास मदत होईल.

19
केंद्र
900+
सत्र
5
वर्ष