झुंज आरोग्याच्या शत्रुशी - ऑनलाईन व्याख्यान

व्याख्याता – आरोग्य साथी लायन सरीता सोनावळे

बुधवार दि. २३ सप्टेंबर २०२०. सायंकाळी ४ ते ५.

ग्यानरुची व लायन्स क्लब ऑफ पुणे २१ सेंच्युरीच्या संयुक्त विद्यमाने आज बुधवार दि. २३ सप्टेंबर २०२० रोजी सायंकाळी ४ ते ५ या वेळात “झुंज आरोग्याच्या शत्रुशी” हा कार्यक्रम गुगल मीटवर होईल. तरी आपण सर्वांनी या कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा.

सरीता सोनावळे या गेली बारा वर्षे महिलांमध्ये कॅन्सर विषयक जनजागृती करत आहेत. आजवर हजारो महिलांना त्यांनी ‘कँन्सरची तपासणी का आवश्यक आहे’ याचे महत्व पटवून दिले आहे. त्यांच्या सल्ल्यानुसार तपासणी करत उपचार घेणा-या शेकडो स्त्रिया कँन्सरला रोखण्यात यशस्वी झाल्या असून, आनंदाने जीवन व्यतीत करत आहेत.

साहित्य, कला, संस्कृतीतून महिला सक्षमीकरण

ग्यानरुची

व्यक्तिमत्व विकास, स्वाभिमान वाढवणारे सक्षमीकरण महिलांची आत्म शक्ती, क्षमता
वृद्धी करणारे असावे अशी ग्यानरुचीची धारणा आहे.

ग्यानरुचीची अशी धारणा आहे कीं, महिला सक्षमीकरण हे स्वाभिमान, व्यक्तीमत्व विकास
वाढविण्यावर भर देणारे असावे. हे सबलीकरण प्रत्येक महिलेच्या आंतरीक शक्ती आणि
मानवी क्षमतांना वाढविणारे असावे.

ग्यानरुची

कार्यक्षेत्र

शिक्षणाची संधी चुकलेल्या दुर्बल घटकांतील महिलांसाठी ग्यानरुची काम करते.
ग्यानरुची

त्यांना मदत करते

साहित्य, कला आणि संस्कृतीतून त्यांचे जीवन परिवर्तन करण्यासाठी
ग्यानरुची

त्यांना सक्षम करते

एखाद्या व्यक्तीला सामर्थ्यवान बनविण्यासाठी सतत प्रयत्न करावे लागतात. कारण सशक्तीकरण म्हणजे केवळ संधी उपलब्ध करुन देणे नाही, तर सावकाश परंतु सातत्याने कौशल्य तयार करणे आहे. जेणेकरुन त्यांच्या आत्मविश्वासाला आकांक्षाची जोड मिळेल.
आमचे

ध्येय

कार्य व्यापकता / कार्याचा परिणाम

जागरूकतेत झालेली वाढ

  • वैयक्तिक व कुटुंबाच्या स्वच्छतेत आणि आरोग्या मध्ये झालेली सुधारणा
  • आंतरिक क्षमता वृद्धी व वाढलेला आत्मविश्वास
  • सामाजिक व कायदेशीर हक्क याची माहिती

व्यक्तिमत्व विकास

  • वैचारिक क्षमता व चाणाक्ष पणा
  • मुलभूत आर्थिक ज्ञान जसे बँक व्यवहार, विमा, रोजचे आर्थिकव्यवहार यांची माहिती
  • आत्मविश्वास आणि व्यक्तिमत्त्व विकास

प्रेरणा वृद्धी

  • प्रतिकूल परिस्थितीला चांगल्या प्रकारे हाताळण्यासाठी सक्षमता
  • नवीन कौशल्य आत्मसात करण्याची इच्छा
  • सामाजिक जागरूकता