सुरुवातीला आमचे सहकारी व स्वयंसेवक वस्तीतील महिलांना भेटतात, त्यांना ग्यान रुचीबद्दल सांगतात आणि त्यांची सहमती घेऊन उपक्रमांची सुरुवात करतात.
‘दि ट्रॅव्हलिंग ट्रंक’ ही लायब्ररी वस्तीत नेऊन आम्ही उपक्रमाची सुरुवात करतो. या लायब्ररीत स्थानिक भाषेतील पुस्तके असतात. आम्ही महिलांना वाचन, कथाकथन, स्वतःला व्यक्त करणे इ. गोष्टींची ओळख कार्यशाळांतून व या लायब्ररीच्या साह्याने घडवतो.
वस्तीतील महिलांना वरचे वर भेटत राहून आम्ही त्यांचा विेशास संपादन करतो आणि त्यांना विविध
विषयांची ओळख करवून देतो जसे-स्वतःबद्दल जागरूकता, आरोग्य व व्यक्तिगत स्वच्छता, कला व साहित्य, नेतृत्वगुण, प्रेरक साहित्य, कौशल्य विकास, इ.
महिला सशक्तीकरण म्हणजे केवळ संधी उपलब्ध करून देणे नव्हे, तर तिला एखादे कौशल्य शिकवणे व तिच्यातील आत्मविश्वास व आकांक्षांना फुलवणे आहे, असा आमचा विश्वास आहे.
येत्या तीन वर्षांत या महिलांध्ये संपूर्ण बदल घडून येईल अशी आम्हाला आशा आहे. त्या स्वतंत्रपणे विचार करू शकतील, आपले निर्णय स्वतःच घेतील आणि आपल्या परिवाराच्या आशा, आकांक्षा तसेच प्रगतीमध्ये मध्ये हातभार लावतील.