संस्थापक आणि विश्वस्त

नसीमा मर्चंट

नसीमा मर्चंट

(संस्थापक)

शिक्षणाच्या माध्यमातून सक्षमीकरण हे ध्येय गाठण्यासाठी नसिमा मर्चंट यांनी आपले सर्वस्व पणाला लावले आहे. संपन्न कुटुंबातल्या असल्या तरी नसिमा मर्चंट यांचे औपचारीक शिक्षण बारावी उत्तीर्ण झाल्यावर थांबले. उर्दू लेखक आणि कवयित्रींचे साहित्य हा त्यांच्या आवडीचा विषय. आयुष्यातील बराच काळ कुटूंबावर लक्ष केंद्रित केल्यावर बहुतांशी स्रीया शिक्षणाकडे वळत नाहीत. परंतु उर्दू साहित्यावरच्या प्रेमाने त्यांना पुन्हा महाविद्यालयीन शिक्षणाकडे ओढले. त्यावेळी त्यांचे वय चाळीस होते. उर्दू साहित्याचा अभ्यास करत त्यांनी संस्थेमध्ये अव्वल नंबर मिळवला. शिक्षणाची आवड, साहित्य आणि साक्षरतेच्या माध्यमातून अल्प उत्पन्न गटातील महिलांना संधी उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने त्यांनी ग्यानरुची प्रकल्प सुरु केला. ग्यान रुचीच्या प्रगतीमध्ये त्यांचा सक्रीय सहभाग आहे. वस्तीला भेट देणे, शैक्षणिक उपक्रमांचे नियोजन करणे यामध्ये आपल्या नेटवर्कचा वापर करत संपूर्ण संघाचे नेतृत्व नसीमा मर्चंट करत आहेत.

मित्र आणि सहकारी असलेल्या डॉ. मुमताज पीरभाय यांच्या सहकार्याने नसीमा मर्चंट यांनी गुलदस्ता-ए-उर्दूची संकल्पना आखली. गुलदस्ता-ए-उर्दू हे उर्दू साहित्याचे ज्ञान आणि कौतुक करण्यासाठी एकत्र येणारे अभ्यासक, कलाकार, लेखक आणि कवी यांचे व्य़ासपीठ बनले आहे.

फारुख मर्चंट

फारुख मर्चंट

(संस्थापक)

फारुख मर्चंट हे मॅसंग ग्रुप ऑफ कंपनीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक आहेत. कॉर्पोरेट जगात, नवकल्पनांचा निर्माता, यशस्वी उद्योजक म्हणून त्यांची ओळख आहे. प्रोग्रँमींग करता येण्या योग्य अशा लॉजिक कंट्रोलरची निर्मिती करणारे भारतातील प्रथम उद्योजक असलेल्या फारुख मर्चंट यांनी एक कर्मचारी असलेल्या कंपनी पासून सुरुवात केली. आज त्यांच्या कंपनीत पाचशे कर्मचारी आहेत हे त्यांचे आणखी एक वैशिष्ठ्य म्हणावे लागेल.

ग्यान रुचीसमवेत त्यांनी नित्यशा फाउंडेशन ही वैद्यकीय स्वयंसेवी संस्था आणि ग्यान अदब ही सांस्कृतिक स्वयंसेवी संस्था देखील सुरू केली. ग्यान रुची येथे ते निधी संकलन आणि संस्थेच्या प्रशासकीय कार्यालयाचा कारभार पाहतात.

एम. ए. (पत्रकारिता), सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

जितेंद्र मैड

मौखिक परंपरा व वंचित जाती समुहांचे अभ्यासक असलेल्या जितेंद्र यांची ओळख सामाजिक कार्यकर्ते, सत्यशोधक पत्रकार म्हणून जास्त आहे. 1990 पासून सहकारी सामाजिक संशोधन केंद्र संस्थेशी (सीसीआरएसएस) त्यांचा संबध आला.

ग्यानरुची मध्ये जितेंद्र हे समन्वयक म्हणून स्थानिक पातळीवर काम पाहतात. शैक्षणिक सत्रांची रचना, विकास व अंमलबजावणी यासाठी मदत करतात. केंद्रावर शैक्षणिक सत्रांचे आयोजन, सादरीकरण आणि शैक्षणिक संसाधने तयार करण्यासाठी व्यक्ती आणि संस्थांशी संपर्क करने, ग्रंथालयासाठी संदर्भ पुस्तके मिळवणे आणि वितरीत करणे, नविन केंद्रासाठी जागा मिळवणे, सुरु करणे याची जबाबदारी जितेंद्र यांच्या वर आहे.

शीघ्र कवीता करणे, गाणे व सुत्रसंचालनातील त्यांची हातोटी लक्षवेधी आहे..लायन्स क्लब ऑफ पुणे २१ सेंच्युरीचा दोन वेळा अध्यक्ष होण्याचा मान त्याला मिळाला आहे.

(प्राथमिक स्त्रोत व्यक्ती)

शैलजा बोकील

दहावीनंतर शिक्षण सोडले असले तरी घरकामातील आपल्या कौशल्याच्या बळावर त्यातून उत्पन्न मिळविण्याची हातोटी शैलजांंना छान जमली. महिला व छोट्या मुलांचे कपडे शिवण्याचे शिक्षण घेतल्यानंतर त्यांनी मशिन व हँड एम्ब्रॉयडरी व फॅशन डिझायनिंग शिक्षण घेतले.

शैलजा या चिंचवडमध्ये महिलांना मशीन स्वेटर-विणकाम शिकवत होत्या. प्रिझम फाउंडेशनच्या विशेष मुलांसाठी असलेल्या उपचारात्मक शाळेत त्या हस्तकला शिक्षिका होत्या. अंदमान आणि निकोबारला पोर्ट ब्लेअर येथील महाराष्ट्र मंडळाच्या अध्यक्षा होत्या.

ग्यान रुची मध्ये, शैलजा या स्थानिक पातळीवरील अनुभवी व्यक्तीमत्व आहे. पाककृती, टेलरिंग, व्यावसायिक हस्तकला आणि अर्थातच उद्योजकता तसेच नेतृत्व यासाठी त्या शिक्षण सत्रांचे नियोजन करतात.

सल्लागार आणि स्वयंसेवक

शैक्षणिक सल्लागार

मशरत तवावाला

ख्यातनाम शिक्षक असलेल्या, मशरत सध्या सुंदरजी संस्थेच्या संचालक आहेत. समुपदेशन आणि विशेष शिक्षणामधील असलेले त्यांचे ज्ञान यामुळे त्या ग्यान रुचीच्या शैक्षणिक विभागांसाठी योग्य मार्गदर्शक ठऱतात. महिलांना शैक्षणिक उपक्रमात व्यस्त ठेवतील अशा मॉड्युलची निर्मिती आणि मांडणी यामध्ये त्यांनी आमच्या स्थानिक पातळीवरील संघाला प्रशिक्षित केले आहे.

(इंग्रजी भाषा शिक्षणासाठी मॉड्यूलची रचना)

रुखसाना जमादार

रुखसाना जमादार या 1980 पासून पुण्याच्या रहिवासी आहेत. उर्दू आणि इंग्रजी भाषेत त्या उच्च पदवीधारक आहेत. टिळक महाराष्ट्र विद्यापीठात इंटरनॅशनल सेल ऑफ इंग्लिशमध्ये त्या प्राध्यापिका होत्या. 1994-2014 पासून लायन्स क्लबच्या मानद सदस्या होत्या. उर्दू भाषेवर अधिक संशोधन करण्यात त्यांना रुची आहे.

स्वयंसेवक

दिलीप बोकील

दिलीप बोकील 40 वर्षे गृहराज्य मंत्रालय भारत सरकार मध्ये सेवेत होते. त्यासाठी त्यांनी देशभर प्रवास केला. सेवानिवृत्तीनंतर त्यांनी मराठी भाषेत अकरावी, बारावीसाठी भौतिक शास्र विषयावर पुस्तके लिहिली. सध्या ते सरस्वती मंदिर प्रशालेसाठी व्यवस्थापकीय समिती सदस्य आहेत आणि ग्यान रुचीमार्फत महिलांसोबत काम करण्याची आवड असलेल्या त्यांच्या पत्नी शैलजा यांना सहकार्य करतात.

उपक्रम सल्लागार

गुलशन मस्कती

गुलशन मस्कती या नित्याशा फाउंडेशनच्या संचालक आणि व्यवस्थापकीय समिती सदस्य आहेत. वैद्यकीय स्वयंसेवी संस्थेच्यावतीने त्यांनी मर्चंट फॅमिलीबरोबर सेवा कार्यास सुरुवात केली. डॉ. वामन खाडिलकर आणि डॉ. अनुराधा खाडिलकर यांच्या अंतर्गत संशोधन समन्वयक म्हणून त्यांनी हिराबाई कावासजी जहांगीर वैद्यकीय संशोधन संस्था (एचसीजेएमआरआय) मध्ये बालरोग अंतःस्रावी विभागात काम केले आहे. आगाखान लोकल सोशल वेलफेयर बोर्ड, आगाखान हेल्थ बोर्ड, आगाखान वुमन अ‍ॅक्टिव्हिटीज पोर्टफोलिओ आणि पुण्यातील आगाखान लोकल काउन्सिलच्या सदस्या म्हणूनही त्यांनी अनेक वर्षे काम केले.

स्वयंसेवी शिक्षक

रेहमत ठाणावाला

रेहमेत या वाणिज्य शाखेच्या पदवीधर असून शिक्षणशास्त्राच्या देखील पदवीधर आहेत. त्यांना पंधरा वर्षांहून अधिक काळाचा शैक्षणिक कार्याचा अनुभव आहे. सध्या त्या बिशप स्कूल, कल्याणी नगर येथे शिकवतात.

आमचे समर्थक

Inner Wheel Club, Pune Downtown

Inner Wheel Club, Pune Downtown

Live Life Love Life Charity Foundation

Live Life Love Life Charity Foundation

Lions’ Club of Pune 21st Century

Lions’ Club of Pune 21st Century